Anil Deshmukh Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: ''परमबीर सिंग हेच मनसुख हिरेन अन् अँटिलीया प्रकरणाचे मास्टरमाईंड''

सुरज सावंत

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात सांगितले की, परमबीर सिंग हे मनसुख हिरेन आणि अँटिलीया बॉम्ब प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. परमबीर सिंग यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचाही आरोप देशमुखांनी केला आहे. परमबीर सिंग यांना विधानभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले त्यावेळी परमबीर यांनी योग्य माहिती दिली नसल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

हे सर्व पाहता मुख्यमंत्र्यांनी आणि मी गृहमंत्री असताना लगेचच परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेऊन त्यांना डीजी होमगार्डकडे पाठवले. अनिल देशमुख म्हणाले की, परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितले की, सचिन वाझे हे परमबीर सिंहांच्या जवळचे अधिकारी होते. परमबीर सिंग हे वसुलीचे काम सचिन वाझे यांना देत असत.

सचिन वाझेंना (Sachin Waze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी माझ्यावर तीन मंत्र्याचा दबाव होता असा गौप्ययस्पोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीस सिंग (Parambir Singh) यांनी ईडीसमोर केला आहे. मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री, आणि पर्यावरण मंत्र्यांचा माझ्यावर दबाव होता अशी धक्कादायक माहिती परमबीर सिंग यांनी ईडीला दिली आहे. सचिन वाझेंना सेवेत घेण्यासाठी आदित्या ठाकरेंनी (Aaditya Thackeray) सुचना दिल्याचा जबाब परमबीर सिंग यांनी ईडी समोर नोंदवला आहे. एवढचं नाहीतर सचिन वाझेंना चांगल्या पोस्टवर घेण्यासाठीही मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्र्यांचा दबाव होता अशी सर्व माहिती परमबीर सिंग यांनी ईडीसमोर दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT