Panvel Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Water Cut: पनवेलकरांसाठी महत्वाची बातमी, ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या परिसरांना बसणार फटका?

Panvel Water Cut: पनवेलमध्ये ३६ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पनवेलकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Priya More

विकास मिरगणे, नवी मुंबई

पनवेल शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. नागरिकांना ३६ तासांच्या पाणीबंदचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) न्हावा-शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. या शटडाऊनचा फटका पनवेल शहरासह सिडकोच्या विविध नोड्स, परिसरातील १४ गावे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि पनवेल रेल्वे स्थानकाला बसणार आहे.

या शटडाऊनदरम्यान वायाळ येथील जलग्रहण वाहिनीमध्ये लोखंडी जाळी बसविणे, साचलेला गाळ काढणे तसेच विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ते रानवारा ढाबा या दरम्यानची जुनी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. लोधिवली येथील गावदेवी मंदिराजवळील जीर्ण जलवाहिनीचीही दुरुस्ती केली जाणार आहे.

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांसोबतच १२ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन एमबीआर अंशतः कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच नवीन पनवेलमधील पुष्पधाम येथे जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा बंदचा परिणाम करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली, वारदोली, नांदगाव, कुडावे, दापोली, पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ आणि नानोशी या गावांवर होणार आहे.

याशिवाय नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर आणि सिडकोच्या इतर भागांतील पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता पाणी पुरवठा बंद संपल्यानंतरही नागरिकांना लगेच नियमित दाबाने पाणी मिळणार नाही. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून २० नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. काही भागांत यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रांजणगाव गणपती परिसरात भीषण अपघात

Shaktipeeth Highway: राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; सत्ताधारी आमदारानेच घेतली विरोधाची भूमिका

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी

Pune Crime : पुण्यात एटीएम फोडून २० लाख ३० हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून चोरट्याचा डल्ला

डायनिंग टेबलच्या समोर आरसा लावावा की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील शुभ-अशुभ संकेत!

SCROLL FOR NEXT