Water Crisis : कल्याण-डोंबिवलीकरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट; दर गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

KDMC water supply news : कल्याण आणि डोंबिवलीतील नागरिकांवर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट ओढवले असून महापालिकेने दर गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Kalyan Dombivli Municipal Corporation latest water cut schedule and timings
Kalyan Dombivli Municipal Corporation latest water cut schedule and timings SAAM TV
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम पुढील वर्षापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरात पुन्हा पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारी, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच सलग २४ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, ही पाणी कपात केवळ एक दिवसापुरती मर्यादित नसून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दर आठवड्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Kalyan Dombivli Municipal Corporation latest water cut schedule and timings
Police Commissioner: पोलीस आयुक्त्याचं व्हॉट्सॲप हॅक; स्टेटसवर 50 मिनिटे चालले अश्लील व्हिडिओ!

या निर्णयामुळे केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी, कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीणमधील विविध गावांना याचा फटका बसणार आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि प्राधान्यक्रमाने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करणे आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी तसेच त्यानंतरच्या दिवशीही महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीच्या आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Kalyan Dombivli Municipal Corporation latest water cut schedule and timings
Water Crisis : ठाणे आणि भिवंडीत पाणीबाणी! काही भागांत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद

मात्र, दर आठवड्याला सलग २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे पाण्याचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे. आधीच शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असताना आता नियमित पाणी कपातीचा निर्णय नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे या पाणी कपातीचा दैनंदिन जनजीवनावर नेमका किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.