Panvel Toilet Saam Tv
मुंबई/पुणे

Toilet: बेडरूम- हॉल अन् किचन...! स्वच्छतागृह आहे की आलिशान घर; ४० लाखांचे टॉयलेट चर्चेत, VIDEO पाहून तुमचेही डोळे फिरतील

Panvel Toilet: पनवेलमधील ४० लाखांच्या टॉयलेटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हे टॉयलेट नाही तर आलिशान घर आहे असे म्हटले जात आहे. यामध्ये बेडरूम- हॉल अन् किचन आहे.

Priya More
  • पनवेलमध्ये ४० लाखांचे शौचालय

  • शौचालयात बेडरूम हॉल किचन आणि बाथरूम

  • पनवेल महापालिकेच्या महागड्या शौचालयाचा व्हिडीओ व्हायरल

  • शौचालय आहे की आलिशान घर अशी होतेय चर्चा

विकास मिरगणे, नवी मुंबई

आतापर्यंत तुम्ही कधी पाहिले आहे का शौचालयामध्ये बेडरूम- हॉल, बाथरूम अन् किचन आहे. याचे उत्तर तर नाहीच असे असेल. पण नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये एका ४० लाखांच्या शौचालयाची जोरदार चर्चा होत आहे. हे शौचालय आहे की आलिशान घर असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चकाकणारे हे शौचालय आज नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरला आहे.पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून हे शौचालय उभारण्यात आले आहे.

पनवेलमध्ये तब्बल ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका स्वच्छतागृहावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या स्वच्छतागृहात चक्क बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूमची व्यवस्था करण्यात केला आहे. बेडसह किचनमध्ये स्वयंपाकाचीही सोय असल्याचा दावा त्यांनी केला असून, हे स्वच्छतागृह आहे की आलिशान घर असा सवाल उपस्थित केला आहे. या शौचालयावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या स्वच्छतागृहासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या स्वच्छतागृहाच्या रचनेवरून विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. या शौचलयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आतमध्येच बेडरुम, किचन आणि बाथरुम आहेत. या शौचालयासाठी चांगल्या कॉलिटीच्या टाइल्स देखील वापरण्यात आल्या आहेत.

‘देशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पहिलं बेडरूम, हॉल आणि किचन असलेलं महापालिकेचं स्वच्छतागृह’ अशी उपरोधिक टीका करत म्हात्रे यांनी ४० लाखांच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संपूर्ण कामाचा खर्च आणि त्यामागील नियोजनाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या शौचालयाचे व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT