Panvel  Saam tv
मुंबई/पुणे

Panvel Crime : पनवेल हादरलं! ४ वर्षांच्या चिमुरडीवर ज्येष्ठ नागरिकाचा अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट

Panvel Crime News : पनवेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलमध्ये ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

पनवेल : पनवेलमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. पनवेलमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पनवेलमधील शेडुंगमध्ये ही घटना घडली आहे. पनवेलच्या शेंडुगमध्ये हरी नावाच्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पनवेलच्या शेडुंग येथील एका खासगी सोसायटीच्या लिफ्टच्या बाजूला असलेल्या भिंतीलगत ज्येष्ठ नागरिकाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी हरीला अटक केली आहे. त्याला कोर्टाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

पनवेल तालुक्यातील शेडुंगमध्ये एका 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरी या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहे. याच खाजगी सोसायटीमधील लिफ्टच्या बाजूला असलेल्या भिंतीलगत ज्येष्ठ नागरिकाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हरी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ नराधम आरोपी हरी याला अटक केली आहे. म

आरोपीला पनवेल न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करत आहेत. या घृणास्पद प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT