फय्याज शेख
शहापूर : शहरात दरोडे टाकून घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलीसांनी नेरळ येथून अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितावर पिंपरी चिंचवडमध्ये मक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला हा आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दरम्यान त्याच्या साथीदारांचा शोध सुरू पोलिसांकडून सुरु आहे.
शहापूर शहरात दरोडे टाकून पसार झालेल्या दरोडेखोराला शहापूर पोलिसांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने नेरळ येथून कुवरसिंग ठाक यास ताब्यात घेतले आहे. कुवरसिंग याने शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे घरफोडी केली होती. तसेच चोरी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे देखील दाखल होते. शहापूर पोलीसांना माहितीच्या आधारे आपली सुत्रे हलवित सदर गुन्ह्यातील आरोपी नेरळ येथील मोहाचीवाडी येथील कोमल वाडी येथून अटक केली आहे.
पत्नी- मुले भेटण्यासाठी आले असता अडकला
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला त्याची पत्नी व मुले भेटण्यासाठी आले असता शहापूर पोलिसांनी नेरळ पोलीसांच्या मदतीने सापळा रचून कुवरसिंग ठाक या आरोपी बेड्या ठोकल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या आरोपीवर पिंपरी चिंचवड येथे मोक्का अंतर्गत कारवाई देखील झाली आहे. सदर आरोपीने अंबरनाथ, टिटवाळा तसेच मुंबई या ठिकाणी साथीदारांच्या मदतीने घातक हत्यार बाळगत दोरोडे, घरफोडी केल्याचे प्रथामिक तपासात उघडकीस आले आहे.
साथीदारांचा शोध सुरु
दरम्यान कुवारसिंग याने आणखीन काही गुन्हा केला आहे का? याचा तपास करत आहेत. तसेच त्याच्या साथीदारांचा शोध शहापूर पोलीस करत आहेत. शहापूरचे उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे व वरीष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवकुमार जाधव, हवालदार शशिकांत पाटील, विकास सानप, रमेश नलावडे, मोहन भोईर यांनी आरोपीला ताब्यात घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.