Panvel -Karjat New Railway Corridor Saam Tv
मुंबई/पुणे

Panvel-Karjat Railway Corridor: पनवेल- कर्जत नव्या रेल्वे कॉरिडॉरचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

Panvel -Karjat New Railway Corridor: मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट ३ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कर्जत- पनवेल या रेल्वे कॉरिडॉरचे काम केले जात आहे.

Priya More

कर्जत- पनवेल या नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम ५६ टक्के पूर्ण झाले आहे. कॉरिडॉरच्या बोगद्यांमध्ये खडीरहित रूळ टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट ३ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या कॉरिडॉरचे काम केले जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प २९.६ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाचे काम २२ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू करण्यात आले होते. या रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई उपनगरीय भागात जास्त कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कार्यक्षमतेचा मार्ग मोकळा होणार आहे.

प्रोजेक्टमध्ये ३ बोगद्यांचा समावेश -

कर्जत-पनवेल कॉरिडॉर या नवीन रेल्वे मार्गावर तीन बोगदे आहेत. यामध्ये नधाळ बोगदा, किरवली बोगदा आणि वावरली बोगदा यांचा समावेश आहे. नधाळ बोगदा २१९ मीटरचा, किरवली बोगदा ३२० मीटरचा तर वावरली बोगदा २,६२५ मीटर लांबीचा आहे. वावरली बोगदा हाच या प्रोजेक्टमधील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्यांच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीचा वापर केला जात आहे. या बोगद्यांमध्ये रूळ टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.

वावरली हा सर्वात मोठा बोगदा -

या प्रकल्पामधील बोगद्यांपैकी २ किलोमीटर लांबीच्या वावरली बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वांत लांब आणि मोठा बोगदा आहे. या प्रकल्पामध्ये दोन रेल्वे उड्डाणपूल, ४४ मोठे आणि लहान पूल, १५ रस्त्यांखालील पूल आणि सात रस्त्यांवरील पुलांचा समावेश आहे. कर्जत -पनवेलदरम्यान असलेली सध्याची मार्गिका माल आणि काही मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी वापरली जात आहे. नवीन कर्जत-पनवेल डबल लाइन कॉरिडॉरमुळे मुंबई ते कर्जतदरम्यान पनवेलमार्गे लोकलसेवा देखील चालवता येणार आहेत. याचा या भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगला फायदा होईल.

कधीपर्यंत प्रोजेक्ट होणार पूर्ण?

कर्जत-पनवेल कॉरिडॉरअंतर्गत ४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. पनवेल, मोहोपे, चिकले चौक आणि कर्जत या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या स्टेशनचे बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे कर्जत-पनवेल कॉरिडॉर प्रकल्पातील बोगद्यांमध्ये बॅलेस्ट-लेस ट्रॅक टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासोबतच सार्वजनिक आश्रय क्षेत्र, एक बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाशव्यवस्था, अग्निशामक यंत्रणा, वायुविजन प्रणालीचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईला रायगड जिल्ह्याशी जोडेल आणि पनवेल, कर्जत आणि प्रस्तावित नवी मुंबई एअरपोर्ट प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या विकासाला चालना देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT