Panvel Karjat Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Panvel Karjat Railway: आनंदाची बातमी! कर्जत-पनवेल लोकलने करा प्रवास, या दिवशी धावणार लाईफलाइन; थेट नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार

Panvel-Karjat Railway Starting Date: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार आहे. पनवेल कर्जत लोकल ट्रेन लवकरच सुरु केली जाणार आहे.

Siddhi Hande

कर्जत पनवेल लोकल लवकरच होणार सुरु

रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर

पनवेल ठरणार महत्त्वाचे इंटरचेज

आता मध्य रेल्वे आणि हार्बर लाइन जोडली जाणार आहे. कर्जतवरुन थेट पनवेलला जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मध्य रेल्वेशी कनेक्ट होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. जे प्रवासी नवी मुंबई ते मुंबई प्रवास करतात त्यांना खूप फायदा होणार आहे. या रेल्वेमार्गाचं काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. लवकरच ही रेल्वेसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.

नवीन मुंबई एअरपोर्टला आता तुम्हाला लोकलने जाता येणार आहे. या मार्गाचं काम महत्त्वाच्या टप्प्यात आहे. हा मार्ग कसा असणार आहे ते जाणून घ्या.

नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना खूप फायदा होत आहे. आता नवी मुंबई विमानतळ मेट्रो आणि रेल्वेशी जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कर्जत ते नवी मुंबई प्रवास सोपा होणार आहे. कर्जत पनवेल रेल्वे मार्गात सध्या स्थानकांचा विस्तार, सुविधा, प्रवासी व्यवस्थापन ही कामे सुरु करण्यात आले.त्यामुळे कामांना वेळ आला आहे.

कर्जत पनवेल लोकल कधी धावणार? (Panvel Karjat Local Train Starting Date)

कर्जत पनवेल रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान या वर्षाअखेरीस रेल्वे सुरु होण्याची शक्यता आहे. अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

कर्जत पनवेल रेल्वे मार्ग २९ किलोमीटर लांब असणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या रेल्वे मार्गात कर्जत, चौक, मोहोपाडा, रसायनी आणि पनवेल ही स्थानके असणाप आहे.

या रेल्वेमार्गातील बोगदे, पूल आणि ट्रॅकची कामे अंतिम टप्प्यात आहे. पनवेलजवळ इंटरचेंज आणि सिग्नलिंगची कामे पूर्ण होत आली आहे.यामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. ही लोकल सुरु झाल्यानंतर पनवेल हे महत्त्वाचे इंटरचेंज ठरणार आहे. लोकल प्लॅटफॉर्मची लांबीदेखील वाढवली जात आहे.याचसोबत पादचारी पुलाचेही काम जोरात सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेली विरोधात; विशालला बसला 440 व्होल्टचा धक्का, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापूर - शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 कोटी रुपयांची थकबाकी

कसाई बाप! नराधम बापानेच मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले; नवी मुंबई हादरली

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, ग्रेड सेपरेटरखाली मोठा कंटेनर अडकला; पाहा VIDEO

Blouse Designs: साध्या साडीवर कोणत्या डिझाईनचा ब्लाउज घालायचा?

SCROLL FOR NEXT