Manasvi Choudhary
अनेकदा धूळ, माती, प्रदूषण आणि घामामुळे शरीरावर मळ जमतो, ज्यामुळे मान, कोपर आणि गुडघ्यांची त्वचा काळी पडू लागते.
एका भांड्यात कॉफी, शॅम्पू आणि इनो एकत्र करून त्यात लिंबाचा रस पिळून घ्या.
या मिश्रणात बुडवून किंवा हाताने मान, कोपर आणि गुडघ्यांवर १५ मिनिटे लावून ठेवा.
त्यानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने स्क्रब करून त्वचा स्वच्छ धुवा.
यामुळे साचलेला मळ आणि काळेपणा झटपट निघून जातो.
शरीरावरील टॅन कमी करण्यासाठी दूध आणि हळदीचा पॅक हा उपाय अत्यंत प्रभावी आहे.
एका वाटीत दूध, हळद आणि मध एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा.
ही पेस्ट मानेवर आणि काळपट पडलेल्या भागावर लावा.
२० मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवून टाका.
यामुळे त्वचेवरील काळपटपणा कमी होऊन त्वचा उजळ होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.