Panvel-Karjat Railway Corridor Nears Completion Saam
मुंबई/पुणे

प्रवाशांसाठी खुशखबर! फक्त एका तासात पनवेल टू कर्जत गाठा; रेल्वे कॉरिडोरचं काम अंतिम टप्प्यात

Panvel-Karjat Railway Corridor Nears Completion: पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे ७९टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ पर्यंत हा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती आहे.

Bhagyashree Kamble

पनवेल ते कर्जत दरम्यानचा प्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. या महत्वाच्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचे सुमारे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी यावेळा व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प सुमारे २९.६ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २,७८२ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे प्रवाशांचा सुमारे ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या येथील स्थानकांवर नवीन प्रकारचे कुंपण बसवण्याचे काम सुरू आहे. पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत या स्थानकांवरील प्रवासी सोयीसुविधा आणि कार्यकारी इमारती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विस्तारित रेल्वे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर पनवेल - कर्जत प्रवासासाठी अखंज आणि वेगवान कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे.

या कॉरिडॉरमुळे पनवेल आणि कर्जत दरम्यान एक महत्वाचा उपनगरीय दुवा निर्माण होणार असून, नवी मुंबई, रायगड आणि परिसरातील नागरिकांना याचा जबरदस्त फायदा होईल. यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

हा महत्वाचा प्रकल्प एमआरव्हीसीतर्फे मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प ३ अंतर्गत राबवल जात आहे. या रेल्वे कॉरिडॉरचं काम वेगाने सुरू आहे. पुल, बोगदे, स्टेशन, यांसह प्रमुख नागरी कामे अंतिम टप्प्यात आहेत. या प्रकल्पात आधुनिक अभियांत्रिकी डिझाइन आणि पर्यावरणच्या गोष्टी लक्षात घेता फॉरेस्ट क्लीयरेंसला प्राधन्य देण्यात आले आहे.

एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर म्हणाले की, पनवेल - कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमुळे या भागात एक नवीन आणि जलद पर्यायी मार्ग मिळेल. यामुळे प्रवाशांची सोय आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच आजूबाजूच्या परिसरातील आर्थिक घडामोडींना चालना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परतीच्‍या पावसाचा अलिबागमध्ये प्रवासी आणि पर्यटकांना फटका

Nora Fatehi Photos: नोरा आली अन् वातावरण बदललं, फोटोशूट पाहून चाहते घायाळ

दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

ICC Women's World Cup 2025: वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार रंगणार, भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा भिडणार, कधी होणार सामना?

Kalyan Dombivli Crime : दादा, भाईंची आता खैर नाही! नाशिकनंतर कल्याण डोंबिवलीत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT