पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात
२०२६ मध्ये प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता
प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी वाचणार
कर्जत-पनवेलचा प्रवास आता सुसाट होणार आहे. पनवेल ते कर्जतासाठी लवकरच रेल्वे सेवा सुरु होणार आहे. रेल्वे कॉरिडोरचं काम शेवटच्या टप्प्यात आले. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत ते पनवेल कॉरिडोरचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
मार्च महिन्यात या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर सीआरएमसीद्वारे तपासणी केली जाईल. यानंतर मध्य रेल्वे ही लाइन सुरु करण्यासाठी वेळापत्रक तयार करेल. यानंतर ही रेल्वे सेवा कधी सुरु करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जत-पनवेल ही रेल्वे सेवा २०२६ मध्ये सुरु होईल. २०२६ मध्ये शेवटच्या सहा महिन्यात सुरु केली जाऊ शकते.
पनवेल ते कर्जत हा रेल्वेमार्ग २९.६ किमी लांब असणार आहे. या ट्रेनमुळे अवघ्या काही मिनिटात तुम्ही कर्जतवरुन पनवेलला जाऊ शकतात. या रेल्वे मार्गासाठी २,७८२ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
३० मिनिटे वाचणार (Panvel to Karjat New Railway Line)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन कॉरिडोरमुळे प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. हा प्रोजेक्ट जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल. सध्या पनवेल, चिखले, मोहोपे, चैक आणि कर्जत स्टेशनवरील काही सुविधा आणि बिल्डिंग उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३ टनलचे काम पूर्ण झाले आहे. कोरिडोरच्या फ्लायओव्हरसाठी गर्डर लावण्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे. अनेक स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक्स इंटरलिंकचे काम पूर्ण झाले आहे.
रेल नेटवर्क वाढणार
पनवेल-कर्जत रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या पनवेल-कर्ज मार्गामुळे नवी मुंबई-रायगडच्या परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.