शरद पवारांच्या वक्तव्यावरती पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया SaamTV
मुंबई/पुणे

होय, मी मोठी नाहीच पण...; शरद पवारांच्या वक्तव्यावरती पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

'मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde आज दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा J. P Nadda यांच्या बैठकी साठी दिल्लाला जात आहेत, या बैठकी संदर्भात त्यांना पत्रकारांनी विचारलं असता आपण पक्षांतर्गत बैठकीसाठी निघाले असून मी दिल्लीला दर 15 दिवसांनी जात असते असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांना शरद पवारांनी त्यांच्या वरती केलेल्या वक्तव्यावरती प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या 'मी मोठी नेता नाही, मात्र मोठ्या नेत्यांकडून लहान नेत्यांनी शिकायचे असते. पवार साहेब आम्हाला शिकवतील' असं त्या म्हणाल्या.(Pankaja Munde's reaction to Sharad Pawar's statement)

हे देखील पहा -

काय आहे प्रकरण

विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त सांगण्यापेक्षा विरोधकाच्या भूमिकेतील आपलं काम करावं असा घरचा आहेर भाजप मधील नेत्यांना मुंडे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात दिला होता. त्यांच्या या वक्तव्याबाबत शरद पवारांच्या Sharad Pawar शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत Press conference प्रश्न विचारला असता पवार म्हणाले 'मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत' त्यांच्या याच वक्तव्यावरती पंकजा मुंडे यांनी वरिल प्रतिक्रिया दिली.

तसेच माझी भूमिका अशी आहे की, ज्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत त्या सक्षमपणे पुर्ण करायला हव्यात आणि आम्ही ते काम करीत आहोत. जनतेसाठी काम करावे, जनतेच्या हितासाठी काम करावे. सरकार पडतंय की राहत हा गौण विषय असल्याचही त्य़ा यावेळी म्हणाल्या. तसेच मराठवाडा दौऱ्याला मी नव्हते कारण मी त्यावेळी आजारी होते. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना देखील ते माहीत आहे. राज्यात मी ज्या व्यसापीठावर आवश्यकता आहे तिथे मी असते असं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire: पुन्हा तीच काळरात्र! आगीच्या ज्वाळा अन् किंकाळ्या, गाढ झोपेतच २० प्रवाशांचा कोळसा; आगीचा गोळा कशी बनली बस?

Famous Singer Death : प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

Rice Chakli Recipe : कुरकुरीत अन् कमी तेलातली तांदळाची चकली, दिवाळीच्या फराळाची रंगत वाढवेल

Maharashtra Rain Alert : दिवाळी संपली तरी पाऊस जाईना, पुढचे २ दिवस महत्वाचे; मुंबईसह २६ जिल्ह्यांना झोडपून काढणार

SCROLL FOR NEXT