Pankaja Munde
Pankaja Munde  Saam TV
मुंबई/पुणे

पंकजा मुंडे यांचे भविष्य उज्ज्वल, भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल; राज्यातील बड्या नेत्याचं वक्तव्य

Jagdish Patil

सचिन जाधव -

पुणे: पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यापुढे उज्ज्वल भविष्य आहे. त्यांनी काम करत रहावं, थोडी सबुरी पाळली तर त्यांना योग्य तो सन्मान मिळेल असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रीमंडळ विस्तार झाला दोन्हीकडचे मिळून एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारार भाजप आणि शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. अशातच काल रक्षाबंधनाच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती.

मंत्रिपदासाठी तुमच्या नावाची चर्चा होते पण मंत्रिपद का दिलं जात नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुंडे म्हणाल्या, 'माझी तेवढी पात्रता नसेल. माझ्यापेक्षा पात्रतेचे लोक असतील. माझी पात्रता वाढेल आणि त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा मला मंत्रिपद देतील. याच्याबद्दल मला काहीही अपेक्षा नाहीत. शिवाय माझ्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा होतात. मात्र, माझे कार्यकर्ते आणि मी शांत बसलो आहोत. मी जे काही काम करते ते स्वाभिमानाने करते'असं म्हणत भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी काल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांच्या याच नाराजीवर आज शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ' पंकजा मुंडे यांच्यापुढे मोठं भविष्य, वय आहे, त्यांना काम करत राहावं लागेलं. त्यांनी थोडी सबुरी पाळली पाहिजे, त्यांना योग्य सन्मान मिळेल. त्यामुळे पंकजा यांना भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये योग्य संधी दिली जाणार असल्याचे संकेतच केसरकर यांच्या वक्तव्यातून दिसत आहेत.

यावेळी बोलताना केसरकर यांनी नाराज अपक्ष आमदारांबाबत देखील वक्तव्य केलं, आमदार नाराज नाहीत, पहिल्या टप्प्यात अनेकजण मंत्रीपद सोडून आले, आम्ही सगळे गेलो तेव्हा ७ मंत्री होते. थोडा मनाचा मोठेपणा पहिल्या टप्प्यात दाखवावा लागतो.

दोन अपक्ष मंत्री होते, पण एकाला घेतलं असत तर दुसऱ्याला नाराज करावं लागलं असतं, मात्र बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा योग्य मान राखला जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तसंच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की, महिलांनाही सन्मान मिळेल, कर्तबगार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभले आहेत ते महिलांचा सन्मान करतील असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

SCROLL FOR NEXT