BJP: भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी शेलार, तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची होऊ शकते निवड

BJP Mumbai And Maharashtra: भाजपच्या नियमानुसार मंत्रिपद असलेल्या नेत्याकडे पक्षातील मोठं पद दिलं जात नाही.
BJP Mumbai And Maharashtra News
BJP Mumbai And Maharashtra NewsSaam TV
Published On

सुशांत सावंत

मुंबई: देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षात (BJP) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत अत्यंत काळजीपुर्वक विचार केला जातो. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आता भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होऊ शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची पुन्हा आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गळ्यात पडणार आहे. तर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि आमदर संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरु पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे. (BJP Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? या दोन्ही पदांसाठी लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांना पसंती असल्याचं बोलंल जातंय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजप ओबीसी चेहरा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपच्या नियमानुसार मंत्रिपद असलेल्या नेत्याकडे पक्षातील मोठं पद दिलं जात नाही. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप पुन्हा सत्तेत आले. ९ ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी आमदार चंद्रकात पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सध्या महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आहे, मात्र आता ते मंत्री झाल्याने त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात येणार आहे. त्यांच्याऐवजी भाजप आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी चेहरा देऊ शकते.

BJP Mumbai And Maharashtra News
Maharashtra Cabinet Expansion 2022 : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणी घेतली शपथ

सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा विचार करता भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे. दुसरं कारण म्हणजे भाजपचे सध्याचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, म्हणज तेसुद्धआ मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनाही आपलं मुंबई अध्यक्षपद सोडावं लागणार आहे. दरम्यान आशिष शेलार यांची मुंबईच्या राजकारणावर चांगली पकड आहे, ते अॅडव्होकेट असल्याने त्याचा फायदाही त्यांना होऊ शकतो आणि त्यांची भाजप मुंबईच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com