Palghar Boyfriend and Girlfriend End life Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: तरुणाने गर्लफ्रेंडसोबत संपवलं आयुष्य, शेतातील झाडाला घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर...

Palghar Boyfriend and Girlfriend End life: पालघरमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडसोबत आत्महत्या केली. कुटुंबीयांनी प्रेमाला विरोध केला या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले. शेतातील झाडाला दोघांनी गळफास घेतला.

Priya More

Summary -

  • पालघरमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • प्रेमाला कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघांनी टोकाचे पाऊल उचलले

  • दोघांनी शेतातील झाडाला गळफास घेतला

  • विक्रमगड पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

पालघरमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने आत्महत्या केल्याची घटना घडली. कुटुंबीयांनी प्रेमाला विरोध केला या त्रासाला कंटाळून दोघांनी टोकाचे पाऊल उचलले.शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली. दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमगड तालुक्यातील सारशी गावात ही हृदयद्रावक घटना घडली. नरेश लहु नडगे (३९ वर्षे) आणि सारिका शंकर महाला (२५ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावं होती. नरेश आणि सारिका एकाच गावामध्ये राहणारे होते. नरेश विवाहित होता आणि त्याला दोन मुलं होती. तर सारिका अविवाहित होती. त्यांचे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. पण नरेशच्या कुटुंबीयांनी या प्रेमाला विरोध केला.

कुटुंबीयांनी प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे नरेशने ३ वर्षांपासून दुसरीकडे लग्न केले. पण त्याचे सारिकावर प्रेम होते. त्या दोघांच्या भेटीगाठी सुरू होत्या. कुटुंबीयांचा विरोध आणि सामाजिक दडपणाला कंटाळून दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. शेतातील झाडाला गळफास घेऊन दोघांनी जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून विक्रमगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT