Palghar News Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar News : काळमांडवी धबधब्यात नाशिकच्या तरुणाचा बुडून मृत्यू; आतापर्यंत बुडालेत 11 पर्यटक

Kalmandavi Water Falls : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हर्षल जितेंद्र बागुल (वय 22. नाशिक) असं मृत तरुणाचं नावं आहे.

Sandeep Gawade

Palghar News

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हर्षल जितेंद्र बागुल (वय 22. नाशिक) असं मृत तरुणाचं नावं आहे. पोलिसांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या प्रकरणाचा जव्हार पोलीस अधिक तपास करत आहेत. आतापर्यंत या धबधब्यात 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र प्रशासनाने काहीच उपयोजना केलेल्या नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल नाशिकहून आपल्या मित्रांसोबत पालघरमध्ये फिरण्यासाठी आला होता. यावेळी काळमांडवी धबधब्यात ते अंघोळीसाठी उतरले होते. मात्र हर्षलला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढला.

अमरावती जिल्ह्यातील मालखेड तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील सांगवा विठोबाच्या यात्रेसाठी कुटुंबासह आलेल्या दोन युवकांचा मालखेड तलावामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. निखिल अनंतराव खरसाण, प्रणव सुरेश पायतळे ( ता . भातकुली) अशी मृतांची नावं आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. काही वेळातच दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT