Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

NEET Paper Leak Viral Message Truth 2026: NEET पेपर पुन्हा फुटल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टेलिग्रामवरील स्क्रीनशॉटमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण सत्य.
Viral Telegram screenshot claiming NEET paper leak creates panic among students ahead of re-exam.
Viral Telegram screenshot claiming NEET paper leak creates panic among students ahead of re-exam.Saam tv
Published On

NEETचा पेपर पुन्हा फुटल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...आधीच पेपर फुटल्याने 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं...त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागतेय...त्यातच आता परत NEETचा पेपर फुटल्याचा दावा केल्याने लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढलीय...प्रश्नपत्रिकेचा एक फोटो टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झालाय...त्या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहुयात...

'KAVERI' असं लिहिलेलं NEET प्रश्नपत्रिकेचे एक पुस्तक दिसतंय. 'Proofs/Price' नावाचा टेलिग्राम युजर दिसतोय. त्यामध्ये वेळ दिसत असून, पुस्तिकेवरील '23' हा कोड आणि इंग्रजी भाषेमुळे अनेकांनी ती खरी प्रश्नपत्रिका असल्याचा दावा केला.

नीट पेपरफुटी प्रकरण देशभरात गाजलं...त्यातच आता 21 तारखेला नीटची परीक्षा होणार आहे...यामुळे असे मेसेज व्हायरल केले जातायत...हा स्क्रीनशॉट टेलिग्राम आणि एक्स यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर करण्यात आलाय...यामुळे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटलीय का, असा प्रश्न अनेकांना पडलाय...या पोस्टमुळे पुनर्परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि तणाव निर्माण झालाय...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...व्हायरल झालेले फोटो कधीचे आहेत...? नीट पेपरचे आहेत का...? याची आम्ही माहिती मिळवली..PIBनेही याबाबत माहिती दिलीय...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

NEETचा पेपर फुटल्याचा टेलिग्रामवरील दावा खोटा

नीट पुर्नपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही

पेपर फुटल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा

व्हायरल प्रश्नपत्रिका NEET परीक्षेची नाही

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावर कोणतीही संशयास्पद किंवा दिशाभूल करणारी पोस्ट आढळल्यास, तिची सत्यता पडताळल्याशिवाय ती शेअर करू नका...आधीच नीटचे विद्यार्थी पेपरफुटीमुळे हैराण झालेयत...21 जूनला होणाऱ्या परीक्षेपूर्वी अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासन सतत दक्षता घेतंय...या परीक्षेला 22 लाखांहून अधिक विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे...विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी असं आवाहन करण्यात आलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत NEETचा पेपर पुन्हा फुटल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com