palghar, kasa market fire, fire brigade saam tv
मुंबई/पुणे

Palghar Fire News : कासा बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक; कोट्यावधींचे नुकसान

या घटनेनंतर नागरिकांनी बाजारपेठेत धाव घेतली.

रुपेश पाटील

Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा येथील मुख्य बाजारपेठेत आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत (kasa market fire) पाच दुकानं जळून खाक झाली आहे. या घटनेती काेट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

पालघर (palghar) जिल्ह्यातील कासा येथील मुख्य बाजारपेठेतील पोलीस ठाण्यानजीकच्या असणारी पाच दुकानं पहाटेच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या ठिकाणी असणारी चप्पल आणि शोभेच्या वस्तू यांच्यासह आणखी तीन दुकानांना भीषण आगीच्या झळा बसल्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या घटनेची माहिती कळताच तत्काळ अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास (fire brigade) यश आले. दरम्यान या आगीत क्षणार्धात दुकानांसह दुकानांमधील कोट्यावधी रुपयांच साहित्य जळून खाक झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी घरगुती हे सीरम करा ट्राय, आठवड्याभरात दिसेल फरक

गृहयुद्धामुळे हाहाकार, रुग्णालयात एअर स्ट्राईक 30 जणांचा मृत्यू, 70 जखमी

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT