Uddhav Thackeray Travel By Local Train Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: बोईसर ते वांद्रे, उद्धव ठाकरे यांचा लोकल ट्रेनने प्रवास

Uddhav Thackeray Travel By Local Train: पालघर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. ही सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास केला.

Priya More

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज पालघरच्या बोईसरमध्ये (Boisar) सभा झाली. पालघर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींच्या (Bharati Kamadi) प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ही सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास केला.

बोईसरमधील सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे कारने बोईसर रेल्वे स्थानकावर पोहचले. उद्धव ठाकरे येताच कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी करत उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे देखील होते. उद्धव ठाकरे यांनी लोकलमध्ये विंडोसिटवर बसून प्रवास केला. त्यांच्या शेजारी संजय राऊत बसले होते. लोकलमध्ये देखील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

बोईसर येथी सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?,' असा सवाल करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'यापुढे मी जी टीका करणार आहे ती पंतप्रधानांवर नाही तर नरेंद्र मोदी यांच्यावर करणार आहे. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी अपमान करू शकत नाही. तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? तुम्ही महाराष्ट्राबाहेरील आहात. महाराष्ट्रात येऊन जी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?'

त्याचसोबत, यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाही. तुम्हाला संपवायला लावलं आहे. तुम्हाला कळलं नाही.' ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या हक्काचं कोणाला ओरबडू देणार नाही. 10 वर्षे दिली त्याचं सोनं नाही तर माती केली. एका पक्षाचे एका व्यक्तीचे सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेते.', असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : मनपा, झेडपी निवडणुका होणारच, स्थगिती नाहीच; कोर्टात काय झालं ते शब्द ना शब्द वाचा

Maharashtra Live News Update: नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Bhakarwadi Recipe: घरच्या घरी बनवा दुकानात मिळते तशी खुसखुशीत बाकरवडी, रेसिपी आजच करा ट्राय

Maharashtra Politics: भाजपमध्ये भूकंप! ऐन निवडणुकीत उभी फूट|VIDEO

सलग ३० दिवस ओट्स खाल्ल्याने शरीरात होतात हे बदल

SCROLL FOR NEXT