Nashik Earthquake  Saam Tv News
मुंबई/पुणे

Earthquake : पालघर भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Palghar Dahanu Earthquake News : पालघरमधील डहाणू आणि तलासरी भागात रविवारी संध्याकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. २०१८ पासून पालघरमध्ये वारंवार हादरे जाणवत आहेत.

Namdeo Kumbhar

Palghar Earthquake News : मुंबईजवळच्या पालघरमध्ये रविवारी रात्री अचानक भूकंपाचे (Palghar Earthquake) धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पालघरमधील डहाणू तलासरी भागात रविवारी संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

रविवारी रात्री अचानक डहाणू आणि परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही सेकंदासाठी जमीन हादरत होती, त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पळ काढला होता. दरम्यान, पालघर आणि परिसरात मागील अनेक महिन्यांपासून भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. २०१८ पासून पालघर आणि परिसरामध्ये सतत भूकंपाचे लहान-मोठे हादरे बसत आहेत.

पालघरमध्ये अचानक भूकंपाचे धक्के

पालघरमध्ये रविवारी अचानक गूढ आवाजाने जमीन हादरली. स्थानिकांच्या मते हे भूकंपाचे सौम्य धक्के होते . डहाणू तलासरी भागात संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने डहाणू, तलासरी आणि आजूबाजूचा परिसर हादरला होता.

पालघरमध्ये भूकंपाचे सतत हादरे -

पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये २०१८ पासून वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. रविवारी रात्री पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे जाणवले. याआधी ७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू, तलासरी, बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा येथे ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के जाणवले होते. ३१ डिसेंबर २०२४, ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२४ मध्येही डहाणू परिसरात सौम्य धक्के जाणवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT