Palghar Earthquake News AI Image
मुंबई/पुणे

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Palghar Earthquake Update News : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ३.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव परिसरात हादरे; जाणून घ्या सविस्तर माहिती.

Alisha Khedekar

  • पालघर जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

  • डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव परिसरात हादरे

  • २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३३ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती

  • भूकंपामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. पालघर शहर काल म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, काल रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव परिसरात भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा धक्का जाणवताच परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरातील वस्तू तसेच खिडक्या-दारे हलल्याचे काही नागरिकांनी सांगितले. अचानक आलेल्या या धक्क्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती आहे.

डहाणू तालुक्यातील या भागात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, भूकंपाच्या धक्क्याबाबत अधिकृत यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच भूकंपाचा धक्का जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT