पुण्यात वारजे येथील डुक्कर खिंडजवळील पुलाच्या कठड्याला पेंटिंग करत असलेल्या कामगारांना कारने जोराची धडक दिली. यात दोन्ही कामगारांचा पुलावरुन खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर चार कामगार जखमी झाले आहेत. दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात घडला. सनी गौड (वय २३ उत्तरप्रदेश) विजय चव्हाण (वय २८ उत्तरप्रदेश) अशी मृत कामगारांची नावे आहेत. दरम्यान पोलिसांनी चालक आरोपी बाळू महादेव शिंदे (वय ३४) याला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कंपनीला एनएचआयच्या मार्फत रंगरंगोटीचे काम दिले आहे. दरम्यान आज या पुलाच्या कटड्याचे काम सुरू असताना दुपारी ३.३० च्या सुमारास भरधाव कारने कामगारांना धडक दिली. यात दोन कामगार पुलावरून खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ४ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बोअरिंग करण्यासाठी जात असलेल्या बोअरच्या गाडीचा विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने गाडीवरील २ कामगारांचा जागीच (Death) मृत्यू झाला. तर अन्य २ कामगार जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार (Beed) बीडच्या परळी शहराजवळ दुपारच्या सुमारास घडला.
सदरची घटना परळी (Parali) शहरालगत घडली असून जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत गोविंदा धवन सिंग व संदीप (रा. ओडिसा) मृत झालेल्या कामगारांचे नाव आहे. हे कामगार परळी शहरालगत असणाऱ्या वाघबेट येथे पाण्याचा बोअर करण्यासाठी आले होते. सकाळी बोअरिंगच्या कामाला सुरवात झाली. काम आटोपल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.