छत्तीसगडच्या बिजापूर-सुकमा सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर मोठा हल्ला झाला आहे. या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि छत्तीसगडचे ३ एसटीएफ-डीआरजी जवानांना वीर आले आहेत तर १५ जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest News)
जखमी जवानांना उपचारासाठी राजधानी रायपूरला पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे जवान गस्ती घालत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गस्तीदरम्यान सीआरपीएफच्या कोबारा कमांडो आणि छत्तीसगड एसटीएफ-डीआरजीच्या जवान जखमी झालेत. दरम्यान नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये अजूनही चकमक सुरूच आहे. २०१२ मध्ये ज्या ठिकाणी २२ जवान शहीद झाले त्याच ठिकाणी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.
सुकमा पोलिसांनी बिजापूर-सुकमा बॉर्डरवर टेकुलगुडमजवळ जवानांची छावणी लावली होती. या छावणीत असलेले सीआरपीएफचे कोब्रा कमांडो, छत्तीसगड एसटीएफ आणि डीआरजीचे जवान गस्ती घालण्यासाठी निघाले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांना हल्ला केला. सैनिकांनी कसं तरी स्वतःला त्या हल्ल्यातून वाचवलं. त्यानंतर त्यांनी नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
नक्षलवाद्यांना त्यांच्या हल्ल्याला उत्तर देत असताना जवानांनी कॅम्पमधील जवानांना झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सुकमा पोलीस, सीआरपीएफ आणि डीआरजी पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नक्षलवाद्यांवर ताबोडतोब हल्ला चढवला. जखमी सैनिकांना सिल्गर कॅम्पमध्ये नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रायपूरला पाठवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ३ जवानही शहीद झाले आहेत. सध्या कोब्रा कमांडो आणि छत्तीसगड डीआरजीच्या अनेक तुकड्या घटनास्थळी तैनात आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.