Kaustubh Ganbote Died In Pahalgam Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pahalgam Terror Attack: 'जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या', कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नीने सांगितली आपबीती

Kaustubh Ganbote Died In Pahalgam Attack: पुण्याच्या कौस्तुभ गनबोटे यांची पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. कौस्तुभ यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नीने हल्ल्यादरम्यानचा थरार सांगितला.

Priya More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी तीन ते चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. कौस्तुभ गनबोटे हे कुटुंबीय आणि मित्र संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांसोबत काश्मीरमध्ये सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी गेले होते. काश्मीरमध्ये पहिल्याच दिवशी ते पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी भ्याड दहशतवादी हल्ला झाला.

कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव आज पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते. मोठ्या संख्येने कौस्तुभ यांचे नातेवाई आणि मित्रपरिवाराने अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी सर्वांना अश्रू अनावर झाले. यावेळी शरद पवार यांनी गनबोटे यांच्या कुटुंबीयांची भेट देत त्यांचे सांत्वन केले. कौस्तुभ यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर टाहो फोडत हल्ल्यादरम्यानची आपबीती सांगितली. 'जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या', असे त्यांनी यावेळी सांगितले.

कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने सांगितले की, 'जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. अजान आती है क्या असं सांगितल्यानंतर आम्ही सगळ्या महिला मोठमोठ्याने अजान म्हणू लागलो. अल्ला अल्ला करायला लावलं. आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो. मारणारे चोघे जण होते. तिथे एक मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्यांना विचारलं या निष्पाप लोकांना का मारत आहात? त्यांनी काय चुकी केली आहे. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता. पण दहशतवाद्यांनी त्या घोडेवाल्याचे कपडे काढून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.'

हल्ल्याचा थरार सांगताना कौस्तुभ गनबोटेंची पत्नी पुढे म्हणाल्या की, 'आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली. पण खूप उशिर झाला. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर माझ्या नवऱ्याला गोळ्या घातल्या. आम्ही त्याठिकाणी घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून. चिखल होता. चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. तिथे घोडेवाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते. ते हल्ला झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT