Pahalgam Terror Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Santosh Jagdale Family: माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळ्या मारल्या, त्यांनाही तसंच मारा..., संतोष जगदाळेंची पत्नी रडून रडून बेहाल

Pahalgam Terror Attack: पहलगाव दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी जगदाळेंच्या पत्नी आणि मुलीने टाहो फोडला.

Priya More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोन मित्रांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. दोघांचेही पार्थिव पहाटे पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील दोघांच्याही निवासस्थांनी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दोघांच्याही पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शोकाकुळ वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

संतोष जगदाळे यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी येताच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या मित्रांना देखील अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीने एकच टाहो फोडला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना हल्ल्यादरम्यानचा थरार सांगितला.

संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांना हल्ल्यादरम्यान सर्वांची काय अवस्था हे सांगितले. हा सर्व घटनाक्रम सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, 'त्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळ्या मारल्या. त्याने काहीही न विचारता थेट गोळ्या झाडल्या. ते सर्वजण मास्क लावून आले होते. शेर आला शेर आला म्हणून पळून गेले. तिकडे कुणीच नव्हते. अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं. जखमींच्या उपचारासाठी दिरंगाई झाली. टुरीझम बंद करा. कायमचा बंदोबस्त करा.'

तसंच, 'त्यांनी जसं गोळ्या झाडून २७ जणांचा जीव घेतला. त्यांना देखील तशाच गोळ्या घाला. तिथली स्थानिक लोकं रडत होते आमच्यासाठी. कारण त्यांचे सगळं टुरिस्टवर चालले होते. लोकांची दुर्दशा झाली. काही तरी बंदोबस्त केला. २७ लोकांना मारलं त्यांनी. २७ कुटुंबांना उद्धवस्त केले. माझं आख्खं आयुष्य उद्धवस्त झालं. माझ्या नवऱ्याला मी बघूही शकत नाही. तिथेही त्यांनी माझ्या नवऱ्याचे तोंड दाखले नाही. त्यांनी जशी लोकांची डोकी फोडली तसंच त्यांना मारा. त्यांना देखील तसंच गोळ्या झाडा. लहान-लहान मुलं रडत होते वडिलांसाठी. काश्मीरमध्ये फिरण्याचा तो आमचा पहिलाच दिवस होता आणि असं घडलं.', असे म्हणत हल्लेखोरांना जशाच तसं मारं अशी मागणी संतोष जगदाळेंच्या पत्नीने केली आहे.

त्याठिकाणी हल्लेखोरांनी घोडेवाल्याला मारलं कारण तो प्रतिकार करत होता. लोकांना मारू नका असं तो म्हणत होता. लोकांचे जीव धोक्यात घालू नका. माझा नवरा आता माझ्यासोबत नाही. आमच्यासोबत असलेल्या माणूस डोळ्यांदेखत गेला. माझी मुलगी आणि आम्ही काय करायचं आता. लोकांचे जीव गेले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्या कुटुंबांनी काय करायचं आता.' असं म्हणत संतोष जगदाळेंच्या पत्नीचे रडून रडून बेहाल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT