जमिनीचा वाद, PSI च्या  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पुण्यात गुंडाराज! जमिनीचा वाद, PSI च्या बायकोनेच केली वाहनाची तोडफोड (पहा Video)

जमिनीच्या वादातून झालेल्या वादातून पीएसआयच्या बायकोने आपल्याच जवळच्या नातलगांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कारची दगडाने तोडफोड केली आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे: शुल्लक कारणावरून पुण्यात गावगुंडांची टोळके वाहनांची तोडफोड करतात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील बावधन बुद्रुक येथे एका पीएसआयच्या (PSI) बायकोने हातात दगड घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे. (Crime News Pune)

जमिनीच्या वादातून झालेल्या वादातून पीएसआयच्या बायकोने आपल्याच जवळच्या नातलगांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कारची दगडाने तोडफोड केली आहे. पी एस आयची बायको कारची तोडफोड करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहेत.

ता. २३ मार्च ला बावधन बुद्रुक या ठिकाणी दुपारी ३ वाजता दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसात मायलेकी विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आहे. फिर्यादीच्या सासू या आरोपी महिलेला आमच्या जागेत बांधकाम करू नका असं समजवून सांगायला गेले असता आरोपी महिलेने आणि तिच्या आईने फिर्यादी महिलेला मारहाण केली.

पहा व्हिडीओ-

पुढे, आरोपी मारहाण करत असताना फिर्यादीचे सासरे आणि पती भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपी महिलेने मारहाण केली आहे. त्यानंतर फिर्यादी महिलेचे पती आणी सासू पोलिस चौकीत आरोपी महिलेविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता अरोपी महिलेने फिर्यादी महिलेच्या सासऱ्याच्या अंगावर आणीत फिर्यादी महिलेवर दगड भिरकावून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT