मनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ) Saam Tv
मुंबई/पुणे

मनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ)

लॉकडाऊन संकटात अनेक खासगी शाळांनी फीसमध्ये भरमसाठ वाढ केली होती तसेच फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सामावून न घेणे, आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे अशा कृत्यांनी विध्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ केला होता.

सुमित सावंत

सुमित सावंत

मुंबई - लॉकडाऊन संकटात अनेक खासगी शाळांनी फीसमध्ये भरमसाठ वाढ केली होती तसेच फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सामावून न घेणे, आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे अशा कृत्यांनी विध्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ केला होता. Order to 8 schools de-recognized

अशा ८ शाळांचे  नाहरकत प्रमाणपत्रचरद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाकडे सादर केलेला आहे. यामध्ये नवी मुंबई विभागातील एकूण ५ शाळा मुंबईतील २ आणि पनवेलमधील एका शाळेचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून शिफारशींसह पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

गेल्यावर्षीपासून शाळा आणि पालकांमध्ये शुल्कवाढीवरून वाद सुरू आहेत. त्याबाबत अनेक प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शाळा आणि पालकांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये असे आदेश न्यायालयाने देऊनही शाळांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी पालकांकडून सातत्याने होत आहेत.

या आहेत त्या ८ शाळा :

  1. अमृता विद्यालय, नेरुळ

  2. न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल, नेरुळ

  3. रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा

  4. सेंट लॉरेन्स स्कूल, वाशी

  5. तेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल, कोपरखैरणे

  6. विश्वज्योत हायस्कूल, खारघर

  7. बिल्लाबोंग इंटरनॅशनल स्कूल, मालाड

  8. न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली

शिक्षण रोखणाऱ्यांना दे धक्का-

लॉकडाऊन Lockdown कालावधीत फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणेफी न भरल्यामुळे निकालपत्र रोखून ठेवणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे, फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे तर मालाड आणि संताक्रूज मधील बिल्लाबोंग शाळेने शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील २५ विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश देणे बंधनकारक असतानाही हे प्रवेश नाकारल्याचे  समोर आले आहे .

त्यामुळे या ८ शाळांवर कारवाईचा बडगा उगारत या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव ही  सादर केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT