उत्पादनाचा खर्च लक्षात घेता यंत्राच्या साह्याने शेती करणे ही काळाची गरज - कृषी विभाग

शेतीची चांगली मशागत कशी करावी याची प्रत्याशिक खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे कृषी विभागाकडुन घेण्यात आले आहे.
उत्पादनाचा खर्च लक्षात घेता यंत्राच्या साह्याने शेती करणे ही काळाची गरज - कृषी विभाग
उत्पादनाचा खर्च लक्षात घेता यंत्राच्या साह्याने शेती करणे ही काळाची गरज - कृषी विभागरोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: दिवसेंदिवस घटणारे मनुष्यबळ, वाढता उत्पादन खर्च आणि शेती करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आता आधुनिक यांत्रिकीकरणाकडे लक्ष द्यावे. कमी खर्चात अल्पवेळीत शेतीची चांगली मशागत कशी करावी याची प्रत्याशिक खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे कृषी विभागाकडुन Agriculture Department घेण्यात आले आहे. The Department of Agriculture has taken the initiative on how to cultivate well.

खेड आंबेगाव जुन्नर Ambegaon Junnar तालुक्यातील पश्चिम आदिवासी डोंगराळ भागात फक्त भात शेती केली जाते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भात शेती करताना शेतक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊसाची दांडी, मजुरांची समस्या, शेतीची मशागतीचा वाढता खर्च अशा अनेक अडचणींचा सामना डोंगराळ भागातील शेतकरी करत आहे.

हे देखील पहा-

शेतमजुरांच्या साह्याने भात लागवड करताना एक एकर क्षेत्राला आठ ते दहा मजूर लागतात. त्यासाठी किमान दोन दिवसाचा वेळ लागतो व आठ ते दहा हजाराचा खर्च होतो. शिवाय भात रोपही जास्त लागते, तेच यंत्राच्या साह्याने फक्त अडीच तासात एक एकर क्षेत्रावर भात लागवड पुर्ण होते शिवाय भातरोपही कमी लागते. त्यामुळे वेळ, पैसा वाचून उत्पन्नही जास्त मिळते.

उत्पादनाचा खर्च लक्षात घेता यंत्राच्या साह्याने शेती करणे ही काळाची गरज - कृषी विभाग
कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वी

भातशेती Rice farming करणा-या शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱयांसाठी आज डोंगराळ भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या Technology माध्यमातून भातशेतीची मशागत, लागवड कशी सुलभतेने करता येते याचं प्रत्याशिक करण्यात आले आहे. यातुन कमी उत्पादन खर्चात कमी वेळेत जास्त शेती लागवडी खाली आणण्यास मदत होऊन आदिवासी तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल, अशी आशा कृषी विभागाकडुन व्यक्त करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com