Balasaheb Thackeray Video viral After Opposition Leaders Meeting In Patana saam tv
मुंबई/पुणे

Balasaheb Thackeray Speech: उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीसाठी बिहारमध्ये; इकडे बाळासाहेबांच्या भाषणाचा Video व्हायरल

Chitra Wagh Tweet On Patna Opposition Meeting: विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे पाटणा येथे गेले आहेत. इकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

BJP Shares Bal Thackeray Speech On Lalu Prasad Yadav: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाटणा येथे गेले आहेत. यावरून भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वात पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे नेते पाटण्यात पोहोचले आहेत. भाजपविरोधात ही एकजूट असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. तर या बैठकीवरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. उद्धवजी बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा… यात बाळासाहेबांनी लालूप्रसाद यादव यांना काय म्हटलं होतं ते ऐका. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल, असे चित्रा वाघ म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस हे उगाच तुम्हाला म्हणाले नाहीत की, खरंच काय होतास तू, काय झालास तू? असा त्यांनी टोलाही लगावला. (Maharashtra Politics)

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

फडणवीसांनीही नेम साधला

पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवरून उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नेम साधला आहे. 'विरोधकांची मोदी हटाव बैठक नव्हे तर कुटुंब बचाव बैठक आहे, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT