Sachin Ahir Join Shivsena Shinde Group Saam Tv
मुंबई/पुणे

Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा धक्का दिला. सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांनी विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

Priya More
  • ऑपरेशन टायगर ३ अंतर्गत शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का

  • सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली

  • सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला

  • त्यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवला

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे एकापोठापाठ एक धक्के देत आहेत. ८ दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे ६ विश्वासू खासदार फोडले. खासदारांनी साथ सोडल्याच्या धक्क्यातून सावरत नाही तोवर उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिंदेंनी आता ठाकरेंचा विश्वासू आमदार फोडला. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला. आज सकाळी सचिन अहिर यांनी विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून अर्ज दाखल केला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनीच भुवया उंचावल्या.

सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मेसेज केला होता अशी माहिती समोर आली आहे. शिंदेसेनेकडून विधानपरिषद सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सचिन अहिर यांनी कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनाम पाठवला. त्यांनी राजीनामा दिल्याचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन अहिर यांनी राजीना दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मन:पूर्वक आभारी आहे. तथापी, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी आपण माझा हा राजीनामा मंजूर करावा. आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे ही नम्र विनंती.'

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावरून ठाकरे गटात अंतर्गत मतभेद असल्याचे उघड झाले होते. प्रियंका चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावर सचिन अहिर यांनी उपरोधिक टोला लगावला होता. "विधेयकाची प्रत पाठवतो," असे म्हणत सचिन अहिर यांनी चतुर्वेदींवर टीका केली होती. या वादानंतर सचिन अहिर पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.सूत्रांच्या माहितीनुसार, हा विषय आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता. आदित्य ठाकरे यांनी अहिर यांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याचेही समजते. मात्र नाराजी कायम राहिल्याने सचिन अहिर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे. अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT