Pune Cat Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात काहीही होऊ शकते, चक्क मांजर खेळतेय कॅरम; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत

Pune Cat Viral Video: पुण्यातील कॅरम खेळणाऱ्या मांजरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या मांजरीचा कॅरम खेळणारा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Priya More

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे की ज्याठिकाणी कुठलाही फोटो असो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्राण्यांच्या व्हिडीओला खूप चांगली पसंती मिळते. माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील चांगली बुद्धी असते. त्यांच्या कृतीतून ते माणसांना बरंच काही शिकवून जातात. जर पाळीव प्राणी असेल तर ते आपण जे करतो त्याची कृती देखील करतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या एका मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक छोटा मुलगा बेडवर कॅरम ठेवून खेळत आहे. त्याच्यासमोर कॅरम खेळण्यासाठी त्याचा मित्र किंवा घरातील कुणी सदस्य नाही तर चक्क मांजर बली आहे. अतिशय शिताफीने आणि हुशारने ही मांजर त्याच्यासोबत कॅरम खेळत आहे. स्टायकरने एक-एक सोंगटीला मारत आहे. या मांजरीला देखील कॅरम खेळण्यात आनंद वाढवत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा हा चिमुकला अगदी त्याच्या एखाद्या मित्रासोबत कॅरम खेळत असल्यासारखं खेळत आहे. या दोघांना खेळण्यासाठी दुसरं कुणाचीही गरज नाही असं वाटत आहे.

हा व्हिडीओ punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. नेटकरी या माजरीचे आणि तिच्या बुद्धीचे खूपच कौतुक करत आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

एका नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'उद्या तो बुद्धिबळ खेळून एखादी आंतरराष्ट्रीय प्रतियोगीता जिंकून येतो वाटतो.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'फॉर्ममध्ये आहे आजकाल' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'दोघांना पण खेळता येत नाही पण त्यांची जोडी जमली.' तर अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर लव्ह इमोजी देखील शेअर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT