Water stock in Mumbai Dams Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dams Water Level: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; धरणांमध्ये फक्त 32 टक्के पाणीसाठा शिल्लक

Today's Mumbai Water Shortage News: मात्र त्यांना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असल्याच चित्र निर्माण झालंय. जून अखेरच्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील 902 गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Ruchika Jadhav

Water Level in Mumbai's Dams Falls Upto Approx 32%

राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हामुळे जिवाची लाही लाही होत आहे. अशात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ३२.३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा फक्त पुढील दोन महिने पुरू शकतो.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणात केवळ ३२.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. मुंबईला रोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपाणीपुरवठा केला जातो.

छत्रपती संभाजी नगरमध्ये पाणीटंचाईच्या झळा

मराठवाड्यासह संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून मुक्या जनावरांना चारा असला तरी मात्र त्यांना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असल्याच चित्र निर्माण झालंय. जून अखेरच्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील 902 गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

बीडमध्ये पाणीटंचाईच्या झळा

आतापर्यंत बीड तालुक्यातून जवळपास 60 गावांचे टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. गेवराई तालुक्यातील 40 गावांचे प्रस्ताव येण्याचा अंदाज आहे. तर माजलगाव तालुक्यातून अन अंबाजोगाई 5, परळी 5, केज 4, धारूर 3, शिरूर कासार 10, आष्टी 5 व पाटोदा तालुक्यातून 8 प्रस्ताव येण्याचा अंदाज आहे. यात पुढील महिन्याच्या शेवटी वाढ होण्याचा अनुमान आहे. त्यानुसार पाहणी करून परिस्थितीनुसार टँकर मंजुरीबाबत निर्णयाची कार्यवाही होणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पैनगंगा नदीकाठावरील 42 गावांत तीव्र पाणी टंचाई

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील 42 गावातील महिलांना पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत असून पाटबंधारे विभागाचे कर्मचारी सध्या निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने पैनगंगा नदीत पाणी सोडण्यास अडचण येत आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर कडक उन्हात पायपीट करून पाणी आणावं लागत आहे. 42 गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ऐन निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता नाकारतात येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

Bapu Aandhle Case : सरपंच हत्या प्रकरणाच्या आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, बीडमध्ये पुन्हा वातावरण तापले

Good News: सोलापूर- अहिल्यानगर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाण्याची चिंता मिटली; उजणी धरण १०० टक्के भरलं

समृद्धी महामार्गावर नियम धाब्यावर, दुचाकीवर तरुणाचा बिनधास्त प्रवास, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT