Sakinaka Police Station
Sakinaka Police Station  सुरज सावंत
मुंबई/पुणे

Online Fraud: फसव्या ग्राहकांपासून सावधान! ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली होतेय फसवणूक

सुरज सावंत

मुंबई - आपल्या दुकानात खरेदीसाठी आलेली व्यक्ती जर खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे आॅनलाईन देत असले, तर ते पैसे नक्की आपल्या खात्यात जमा झाले आहेत का ? याची खात्री करून घ्या कारण आॅनलाईन पैसे देण्याच्या नावाखाली पैसे खात्यातावर टाकल्याचा बनावट मेसेज दाखवून फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या टोळीचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (Online Fraud Through Spoof Paytm app in mumbai)

साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) परिसरात हॉटेलमध्ये (Hotel) भाड्याने राहण्यासाठी तीन जणांनी रूम बुक केले. या तिघांचे बिल पन्नास हजार पर्यंत झाले. हाँटेलमधून निघताना तिघांनी हॉटेल मॅनेजरला Spoof Paytm app मधून पेमेंट केल्याचे भासवले. मोबाइलवरील पेमेंट (Mobile Payment) झाल्याचा मेसेज पाहून हाॅटेल मेनेजरनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून जाऊ दिले.

हे देखील पहा -

जेव्हा हॉटेल मालकाने बँकेमध्ये चौकशी केली असता त्यावेळी बँकेच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते. हाॅटेल मेनेजरने युट्युबवर Spoof Payatm app च्या फसवणुकीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपल्या सोबत सुद्धा फसवणूक झाली आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासांमध्ये या तीन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद खालील उर्फ अनस अब्दुल कलाम शेख ( 23 ), इब्राहीम समसुद्दिन काजी (27), आयुष सुहास जगदाळे अशी या आरोपींची नाव आहे. हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेश मधले राहणारे आहेत. या आरोपींनी Spoof Payatm app नावाने मुंबईत अजून कुठे- कुठे फसवणूक केली. या टोळीमध्ये आणखी कोण साथीदार आहेत याची चौकशी साकीनाका पोलिस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT