Central Government Permitted Onion Export  Yandex
मुंबई/पुणे

Onion Export : निर्यातबंदी उठल्यानंतरही कांद्याचा वांदाच; मुंबईत तब्बल ४०० कंटेनर अडकले, कारण काय?

Onion Export News : निर्यातबंदी हटवल्यानंतरही कांद्याने शेतकऱ्यांचा वांदाच केला आहे. तांत्रिक कारणामुळे कांद्याचे तब्बल ४०० कंटनेर मुंबईत अडकून पडले आहेत.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्याबंदी हटवून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. ४० टक्के उत्पादन शुल्क लावून सरकारने कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. मात्र, तरी देखील कांद्याने शेतकऱ्यांचा वांदाच केला आहे. तांत्रिक कारणामुळे कांद्याचे तब्बल ४०० कंटनेर मुंबईत अडकून पडले आहेत.

जेएनपीटी आणि कस्टम विभागाची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे हे कंटेनर मुंबईतील बंदरावर अडकून पडल्याची माहिती आहे. कंटेनर खोळंबल्याने जहाजाचे भाडे देखील वाया गेले आहेत. याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. सरकारने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी होत आहे.

कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी गेल्यावर्षी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली होती. पुढे ही निर्यातबंदी मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी हवालदील झाले.

सरकारने कांद्यावरील निर्याबंदी हटवावी अशी मागणी केली जात होती. विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलं होतं. अखेर तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्याबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

निर्यातबंदी हटवताना केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के उत्पादन शुल्क देखील आकारलं. आता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी काही सुटत नाही. तांत्रिक कारणामुळे कांद्याचे तब्बल ४०० कंटनेर मुंबईतील बंदरावरच अडकले आहेत. आज ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

SCROLL FOR NEXT