Pune Crime News
Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: एकाच प्रेयसीचा दोन प्रियकरांनी केला खून; जुन्नरमधील धक्कादायक घटना

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

Pune Crime News: पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जुन्नर येथे एका तरुणीचा दोन प्रियकरांनी मिळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र ही हत्या फक्त प्रेमाच्या वादातून झालेली नसून पैशांवरून झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून नारायणगाव येथे एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह अज्ञात ठिकाणी पडून होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत अधिक तपास सुरू केला. सदर महिला वडगाव कांदळी येथील वडामाथा परिसरात मृत अवस्थेत सापडली होती.

पोलिसांनी महिलेची ओळख पटवत तिचे घर गाठले. यावेळी ३० वर्षीय महिलेचे दोन पुरूषांबरोबर प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यांनी दोन्ही प्रियकरांचा शोध घेतला. दोघेही तरुण ३० वर्षीय तरुणीच्या प्रेमात होते. मात्र तरुणी दोघांना देखील ब्लॅकमेल करत होती. दोन्ही प्रियकरांकडे तरुणी सातत्याने पैशांची मागणी करत होती. मात्र पैसे न दिल्याने ती त्यांना वेगवेगळ्या धमक्या देऊ लागली.

तरुणीच्या सततच्या या त्रासाला दोन्ही प्रियकर कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी एकत्र येत एक कट रचला. दोघांनी तरुणीला एका अज्ञात ठिकाणी नेले. तिथे तिच्या पाठीत आणि डोक्यात वार करत तिला ठार केले. सदर घकटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi Sabha: मोठी बातमी! मोदींच्या सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीसा; पोलिसांकडून अनेकांची धरपकड

Madhuri Dixit Net Worth : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Narendra Modi: PM मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार, कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभा घेणार; मुंबईत करणार रोड शो

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

SCROLL FOR NEXT