Pune Crime News : पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर; कोयता गँगचा हैदोस सुरुच

सराईतांनी हातात कोयते व तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv
Published On

Pune Crime News : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा असे सांगितले. त्यानंतर काही सराईतांनी हातात कोयते व तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

आज, रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News
Wardha News : हत्येचा पुरावा नसताना पोलिसांनी लावला छडा; गुन्हेगारांना पकडल्यावर गावकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) या सराईतांनी संबंधित महिलेलाही मारहाण केली असून लहान मुलाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती व लहान मुले बाहेर खेळत होती.

रस्त्यावरुन दुचाकीवरून काही तरुण वेगाने ये-जा करत होते. महिलेने मुलं खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले असता त्याचा राग धरुन त्या तरुणांनी महिलेला मारहाण केली.

त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागले. या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला असून संबंधित तरुण हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Pune Crime News
Mumbai Crime News : छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं भोवलं; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला केली पोलिसांनी अटक

काही दिवसांपूर्वी कोयता गँगवर केली मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोयता गँगवर अॅक्शन घेण्यास सुरूवात केली आहे. कॉंम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत आत्तापर्यंत १०८ पेक्षा अधिक कोयते जप्त करण्यात आले आहेत.

संपूर्ण शहरभरात ही कारवाई केली जात असून पुणे पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखे अंतर्गत या बेधडक कारवाईला सुरूवात केली. या बेधडक कारवाईत कोयता वापरणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com