Mumbai Crime News : छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं भोवलं; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला केली पोलिसांनी अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सध्या तुरुंगवास भोगत असला तरी त्याचा मुंबईत शिष्याने वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली होती.
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam Tv

Mumbai Crime News : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सध्या तुरुंगवास भोगत असला तरी त्याचा मुंबईत शिष्याने वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली होती. छोटा राजनच्या साथीदारांनी त्याचा वाढदिवस साजरा करत केक कापला होता. या प्रकरणी ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांना काल रात्री उशिरा टिळक नगर पोलिसांनी अटक केली. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Navi Mumbai: आईने दुसऱ्या मजल्यावरून अभ्रक खाली फेकले; अन्... धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

कुख्यात गुंड छोटा राजन ( राजेंद्र सदाशिव निकाळजे) याच्या वाढदिवसानिमित्त केक निलेश पराडकर यांनी कापला होता. छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर निलेश पराडकर यांना टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

निलेश पराडकर यांना वाढदिवसाचा केक कापल्याप्रकरणी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने काही अटी शर्तीवर पराडकर यांना जामीन मंजूर केला आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे पासपोर्ट जमा करणे, तसेच कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नये अशा अटी आणि 25 हजार रुपये जात मुचलक्यावर अंतरिम जामीन देत दिलासा दिला आहे.

Mumbai Crime News
Nepal Aircraft Crash: मोठी बातमी! नेपाळमध्ये विमान कोसळलं, भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू; बचावकार्याला सुरूवात

केकवर लिहिलं होतं बिग बॉस

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा तिहारमध्ये तुरुंगवास भोगत असला तरी, त्याचा वाढदिवस चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश पराडकर यांनी त्यांच्या साथीदारांनी १३ जानेवारी रोजी साजरा केला. त्यांनी केकवर बिग बॉस असं लिहिलं होतं. छोटा राजनच्या या शिष्याचं नाव निलेश पराडकर असून ते छोटा राजनसह अनेक प्रकरणात आरोपीदेखील होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com