Uddhav Thackeray On Corona Saam TV
मुंबई/पुणे

कोरोना वाढतोय; CM उद्धव ठाकरे म्हणाले, पुढचे १५ दिवस महत्वाचे!

राज्य शासन पुढील १५ दिवस कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीवर लक्ष ठेवून असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : कोरोना पुन्हा डोके वर काढत असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांच्या वर्षा या निवासस्थानी टास्क फोर्स सदस्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत, राज्य शासन पुढील १५ दिवस कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) आकडेवाडीवर लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण (Vaccination) करून घ्यावे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

या बैठकीच्या सुरुवातीला डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. १६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असं व्यास यांनी सांगितले.

तसंच मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा (Mumbai) पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही त्यांनी सांगितंल.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तसंच कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या (School) बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच, ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करण्याचे, गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याचे आणि १२ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवण्यांचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खडकवासला धरणावर उभारला जातोय भलामोठा उड्डाणपूल; २७६ खड्डे खणले, कोणत्या गावांना होणार फायदा?

Shahada : दीड महिन्यापासून पगार थकित; शहादा नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कामबंद

Vande Bharat 4.0 : रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! लवकरच सुरु होणार वंदे भारत ४.०, कसा असणार प्लॅन?

Morning Drink: सकाळी प्या हे ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात होईल वजन कमी अन् पचनक्रिया सुधारेल

Diwali 2025: वसुबारसनिमित्त गोमातेची पूजा करत शेतकऱ्यांनी केली दिवाळी सणाची सुरूवात; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT