मुंबईकरांनो, काळजी घ्या! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
Corona Latest News Update
Corona Latest News UpdateSaam Tv
Published On

मुंबई: मुंबईवरील कोरोनाचं संकट (corona) पुन्हा वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ७०४ (corona new patients) नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३४९ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे.

Corona Latest News Update
महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा मास्टर प्लान, शरद पवारांनी दिल्या 'या' सूचना

मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. राज्य सरकारनंही तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रुग्णवाढ झपाट्यानं होत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

निर्बंध नको असतील तर, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सूचना आणि नागरिकांना आवाहन केलं असतानाच, मुंबईतील कोरोना आकडेवारीचा गेल्या २४ तासांतील अहवाल समोर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. आज, गुरुवारी ७०४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर याच कालावधीत ३४९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Corona Latest News Update
ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; ७ जण जागीच ठार, १६ जण जखमी

आजपर्यंत मुंबईत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०,४४,३५४ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे. एकूण सक्रिय रुग्ण ३३२४ इतके आहेत. दुपटीचा दर १७६५ दिवसांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात १०४५ नवे रुग्ण

राज्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट घोंघावत असल्याचं चित्र आजच्या अहवालावरून दिसतंय. राज्यात गेल्या २४ तासांत १०४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ५०७ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळं एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com