जुना मुंबई-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अजीत पवारांनी घेतली दखल
जुना मुंबई-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अजीत पवारांनी घेतली दखल दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

जुना मुंबई-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अजीत पवारांनी घेतली दखल

दिलीप कांबळे

पुणे: मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील कामशेत येथे एक किलोमिटरचा पूल तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन भाजप सरकारने केला होता. जेणेकरून ट्राफिक जाम होणार नाही. मावळ मधील कामशेत ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे नाणे मावळ, पवनमावळ, अंतर मावळ येथून आपला व्यवसाय करण्यासाठी किंवा पुण्या मुंबईत जण्या करीता नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. मुंबई वरून पुण्या करिता किंवा पुण्यावरून मुंबई करिता याच मार्गाचा उपयोग वाहन चालक करीत असतात. त्यामुळे कामशेत मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असे. त्या मुळे निविदा काढून सतरा कोटीला एक किलोमीटर लांबीचा पूल तयार करण्याचे ठरले. त्यावेळी दीड ते दोन वर्षात हा पूल पूर्ण होईल असं सांगण्यात आले मात्र तब्बल पाच वर्ष होऊनही हा पूल अर्धवटच राहिला या पुलाला संरक्षण कठडे नाही आजूबाजूला सर्विस रोड मध्ये खड्डेच खड्डे आहे.

ड्रेनेज लाईन असून अर्धवट काम केली आहे. त्यामुळे यातून वाट काढायला नागरिकांना कसरत करावी लागते. आतापर्यंत या पुलावरून प्रवास करताना शेकडो नागरिकांचे बळी या पुलाने घेतले आहे. तरीही हा पूल पूर्ण कसा झाला याचा जाब नागरिक विचारात आहे. तर शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केले. मात्र तत्कालीन सरकारला जाग आली नाही. या पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम आहे. दरम्यान हा पूल वाहतुकीस बंद करून पुन्हा याचे काम करावे. अन्यथा आंदोलनाचा इशारा कामशेत येथील शिवसैनिकांनी दिला. दरम्यान जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून एका कार्यक्रम करिता अजित पवार वडगावला आले होते. तेव्हा कामशेत येथे नव्याने बांधण्यात करण्यात आलेल्या एक किलोमीटर लांबीचा उड्डाणपुलाचे काम पाहून अजित पवार यांचे डोके फिरले तेव्हा म्हणाले असा कुठे पूल असतो व्हय. उड्डाणपूल पाहून पवारांनी भर सभेत कॉन्ट्रॅक्टरचे वाभाडे काढले.

मुंबई पुणे जुन्या महामार्गावर कामशेत येथे एक किलोमिटर लांबीचा पूल तयार केला मात्र या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे यात शेकडो नागरिकांचे या पुलाचे बळी घेतले आहे. तरी हा पूल बंद करून पुन्हा हा पूल नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी व्यवस्थित करावा जेणेकरून नागरिकांचे बळी जाणार नाही. विविध विकास कामाकरिता राज्य सरकार कोट्यावधी रुपये चा निधी देतात मग काम का नीट होत नाही. इथले लोकप्रतिनिधी किंवा नागरीक यांनी या विकास कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाही तर निकृष्ट दर्जाचे काम करून कॉन्ट्रॅक्टर निघून जातो. तो फक्त मलिदा कसा जास्त मिळेल हे बघत असतो. मात्र त्याची किंमत नागरिकांना मोजावी लागते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT