Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: वृद्धाला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; केअर टेकर तरुणीसह चौघांना अटक

Mumbai Latest News: मुंबईच्या खार पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने वृद्ध नागरिकाकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही | मुंबई ९ जानेवारी २०२४

Mumbai Crime News

मुंबईच्या खार पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने वृद्ध नागरिकाकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी वृद्ध नागरिकाच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या ४ जणांन अटक केली आहे.

नीतू (२० वर्षे), अनिल चौहान (३२), किरण नायर (२४) आणि राजेश केवट (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या हे चारही आरोपी खार पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींनी प्रकारे इतर काही वृद्ध नागरिकांना फसवले आहे का याबाबत अधिक तपास करत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, खार परिसरात घरात एकटेच राहणाऱ्या विपिन शेठ यांनी आठ दिवसापूर्वी आपली देखभाल करण्यासाठी एक केअर टेकर मुलीची एजन्सी मार्फत नेमणूक केली. मात्र, तरुणीच्या वर्तवणुकीचा संशय आल्याने ८ दिवसानंतर विफिन शेठ यांनी उद्यापासून तू कामावर येऊ नकोस असे सांगितले.

त्यांनी तरुणीला ८ दिवसांचा पगार आणि अधिकचे ५०० रुपये देखील दिले. पगार घेऊन गेल्यानंतर केअर टेकर मुलीने दुसऱ्या दिवशी फोन करून तुमचा अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहे तुम्ही जर मला ३० हजार रुपये दिले नाही तर तो व्हिडिओ मी व्हायरल करील असे सांगितले.

काही वेळातच मुलीला कामावर ठेवणाऱ्या एजंटने फोन करून सेठ यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान, सेठ यांनी खार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचत केअरटेकर नीतू आणि एजंटच्या मुसक्या आवळल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केलं आहे.

या गुन्ह्यात अजून दोन जणांचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले. यानंतर त्या दोघांनाही खार परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी अशाच प्रकारे इतरांची फसवणूक केली आहे का, याबाबतचा अधिकचा तपास खार पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT