Crime News: संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ उकिरड्यावर फेकलं; २१ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल

Nagpur Crime News: थंडीचा कडाका असल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत निर्दयी मातेला अटक केली आहे.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV
Published On

Nagpur Latest Marathi News

नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबधातून २१ वर्षीय तरुणी गर्भवती झाली. तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भीतीने तिने बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं.

थंडीचा कडाका असल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत निर्दयी मातेला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Crime News
IMD Weather Alert: महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये कोसळणार अतिमुसळधार पाऊस, वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरुणी गर्भवती झाली. गावात बदनामी होईल आणि कुटुंबीय आपल्याला मारहाण करतील, या भीतीपोटी दोघांनीही सप्टेंबर महिन्यात नागपूर गाठले.

एका व्यक्तीच्या घरात दोघेही कामाला लागले. दरम्यान, तरुणीच्या प्रसुतीची वेळ आली असता, तिचा प्रियकर कामानिमित्त दुसऱ्या राज्यात निघून गेला. अखेर तरुणीने प्रसुतीसाठी एका महिलेची मदत घेतली. ४ जानेवारीला तिने घरातच एका गोंडस बाळाला जन्म दिला.

या बाळाला काय नाव द्यायचं असा प्रश्न तरुणीसमोर होता. तिने बाळाचा जन्माची लपवणूक करून पुन्हा गावी जाण्याची योजना आखली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून देत पळ काढला.

परिसरातील एका व्यक्तीने बाळाचा रडण्याचा आवाज बघितला. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांना बाळाला मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बाळाचा आईचा शोध घेतला.

Nagpur Crime News
Covid JN.1 Cases: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार; पुण्यात एकाच दिवशी ५९ रुग्ण, राज्यात काय परिस्थिती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com