Sexual Assault Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्याला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Pune Crime News : या अधिकाऱ्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तेरा वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे: चार अल्पवयीन मुलींच्या (Minor Girls) लैंगिक छळ (Molested) प्रकरणात निलंबित सनदी अधिकारी मारुती सावंत याला विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिक अत्याचार आणि तीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सावंत याच्यावर सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा नोंद होता. (Pune Crime News)

हे देखील पाहा -

मारुती सावंत हा १९९८ च्या बॅचचा बढती मिळालेला सनदी अधिकारी होता. त्यावेळेस महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालक पदावर कार्यरत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने त्याच निलंबन केलं होतं. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तेरा वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेतील माजी महासंचालकाला विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरी आणि सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मारुती हरी सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सावंत याच्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम, धमकावणे, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये ५ मार्च २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांची प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित मुलीच्या शाळेतील मुख्याध्यापिकेने सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सावंत यांनी अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार केल्याचे उघड झाले होते. या सर्व मुली एका शाळेत वेगवेगळ्या वर्गात शिकत शिक्षण घेत होत्या. सावंत मुलींना नेहमी फ्लॅटवर बोलावून चॉकलेट खाण्यास देत असे, त्यानंतर अश्लील चाळे करीत त्यांना संगणकावर अश्लील छायाचित्र दाखवत असल्याचे मुलींनी तपासात सांगितले होते. त्याच्या संगणकावरून पोलिसांनी ४४३ अश्लील व्हिडिओ आणि ७ हजार १७९ अश्लील फोटो असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

सावंत एका तेरा वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. याबाबत सिंहगड पोलिसांनी एका मुलीवर लैंगिक अत्याचार आणि इतर तीन मुलींचा लैंगिक छळ असा गुन्हा दाखल करुन कारवाई केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT