संतापजनक! बहिणीचे विवस्त्र छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत भावांकडे पैशांची मागणी

Aurangabad Crime News |"तुझ्या बहिणीचे माझ्याकडे विवस्त्र छायाचित्र आहे. ते व्हायरल न करण्यासाठी ८५ हजार रुपये लागतील" अशी धमकी देत खंडणी मागणी करणाऱ्याला अटक.
Sexual Abuse Blackmail
Sexual Abuse BlackmailSaam TV
Published On

नवनीत तापडिया, औरंगाबाद

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. बहिणीचे विवस्त्र छायाचित्र व्हायरल न करण्यासाठी तिच्या भावांना ब्लॅकमेल (Blackmail) करत दोन जणांनी ८५ हजार रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Aurangabad Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, चरणसिंग चरावंडे (वय २२, रा. कौवचलवाडी, अंबड) असे त्याचे नाव असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. "तुझ्या बहिणीचे माझ्याकडे विवस्त्र छायाचित्र आहे. ते व्हायरल न करण्यासाठी ८५ हजार रुपये लागतील, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या विकृताला मुकुंदवाडी पोलिसांनी सापळा लावून अटक केली." तरुणीचे मुकुंदवाडीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, एका वर्षानंतर ते संपुष्टात आले. ती मुकुंदवाडीत आई-वडील आणि भावासोबत राहते.

२ जुलैला तिच्या भावाला मंगेश गोडसे नावाच्या तरुणाने संपर्क केला. "तू तिचा भाऊ आहेस ना, तुझ्या बहिणीचे माझ्याकडे विवस्त्र छायाचित्र आहे. ते व्हायरल करू का?" असा त्याने व्हॉट्सअॅप मेसेज केला. त्यानंतर पुन्हा जलाल शेख नामक तरुणाने कॉल केला. "मी मंगेश आणि करणचा मित्र आहे, तू मंगेशचा फोन का कट करत आहे?" असे विचारत धमकावले. नंतर करणने त्याच्या मावस भावाला कॉल करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यासाठी ८५ हजारांची खंडणी मागितली. त्यामुळे त्याला एक हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर दोन्ही भावांनी करणला संपर्क साधून पैसे देण्याची तयारी दाखवली.

Sexual Abuse Blackmail
धक्कादायक! भूतबाधा घालवण्यासाठी आई - वडिलांकडून मारहाण, ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

यानंतर ५ ऑगस्टला दोन्ही भावांनी मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरींकडे तक्रार केली. गिरी यांनी सहायक निरीक्षक एस. बी. मिरधे यांना सापळा लावण्याचे आदेश दिले. करणला पैसे घेण्यासाठी मुकुंदवाडीत बोलावले. पोलिस आडोशाला साध्या वेशात उभे राहिले. करणने पैसे स्विकारताच पोलिसांनी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com