Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil Saam Tv
मुंबई/पुणे

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Chhagan Bhujbal on Maratha Aarakshan: मराठा समाजाच्या सर्व मागण्या सराकराने मान्य केल्या. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी नेते न्यायालयात जाणार आहेत. छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्येचर्चा सुरू आहे.

Priya More

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर देखील काढला हा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडे देण्यात आला. जीआर हाती आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. सरकारने काढलेल्या जीआरविरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार आहेत. छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज जीआर काढला. ओबीसींच्या हक्कांवर सरकारने जीआर काढून अन्याय केल्याची ओबीसी नेत्यांची भावना आहे. त्यामुळे ओबीसी नेते या जीआरविरोधात कोर्टात जाणार आहेत. यासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू आहेत. सरकारचा जीआर कायद्याच्या पटलावर टिकणार का? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारने काढलेल्या जीआरची होळी करावी, असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना केले आहे. सर्व ओबीसी बांधवांनी उद्या म्हणजे ३ सप्टेंबर रोजी आपल्या तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित जीआरची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करावा. तसेच, मोठ्या संख्येने एकत्र येऊन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र देऊन या निर्णयाचा विरोध करावा, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी याला विरोध केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारच्या निर्णयावर नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, 'सरकारने जी उपाययोजना केली आहे ती राज्यातील ओबीसी आरक्षण संपवणारी आहे. राज्यात बोगस प्रमाणपत्र दिली जात आहेत. अगदी २५ हजारपासून ते लाख रुपयांपर्यंत याची किंमत आहे. हा जी आर शासनाला काढायचा अधिकार नाही. उपसमिती एकतर्फी निर्णय घेतला आहे. सरकारला झुंड कळत असेल तर झुंड घेऊन जावं लागेल. पुढे जाऊन रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. येत्या निवडणुकात बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

SCROLL FOR NEXT