OBC community  Saam tv
मुंबई/पुणे

OBC Bahujan Party : निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एक नवीन पक्ष, राज्यातील ओबीसी नेत्याने केली घोषणा

Prakash Shendge News : मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

Maharashtra Political News :

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दुसरीकडे राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आज बुधवारी ओबीसी समाज आधारित नव्या पक्षाची घोषणा केली. शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाचं नाव आणि ध्येय धोरणांची घोषणा केली. 'ओबीसी बहुजन पक्ष' असं या पक्षाचं नाव आहे.

प्रकाश शेंडगे पत्रकार परिषदेत म्हणाले, 'मराठा आरक्षणाचा वादळ महाराष्ट्रावर घोंघावत आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलं. सत्तेचा वापर ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी घाला घालण्यासाठी करण्यात आला. सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं. त्यानंतर आता पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचा झेंडा हा पिवळ्या रंगाचा असणार आहे. हा पक्ष लोकसभेच्या 48 जागा लढवणार आहे. 10 ते 12 जागा फायनल झाल्या आहेत, असे ते पुढे म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या तब्येतीविषयी शेंडगे म्हणाले, मी जरांगेंना आवाहन करेन की, तुम्ही उपोषण थांबवा. ते समाजासाठी आणि तुमच्यासाठी हिताचं आहे. आरक्षण असं पटकन मिळत नाही. आमचा धनगर समाज दोन पिढ्या लढतोय. सरकार टिकणार आरक्षण देणार आहे. त्यांना वेळ द्या'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT