Shivsena SaamTV
मुंबई/पुणे

Shivsena विभाग प्रमुख मारहाण प्रकरण; माजी नगरसेविकेसह ८ जणांवर गुन्हा

एनआरआय पोलिस ठाण्यात झाली हाेती तक्रार दाखल.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : शिवसेना (shivsena) विभाग प्रमुखांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि त्यांच्या समर्थकांवर मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि धमकाविणे असे एनआरआय पाेलिसांनी (police) विभाग प्रमुखांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. (navi mumbai latest marathi news)

दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या (bjp) व्यासपीठावरील उपस्थिती आणि विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने सेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली.

त्यानंतर शिवसेनेचे बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलिस ठाण्यात (NRI Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या आठ समर्थकांवर मारहाण, शिवीगाळ करणे व धमकावणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT