Palghar saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : पेसा शिक्षक, सर्वच पद भरतीत स्थानिक बिगर आदिवासी पात्र उमेदवारांचा समावेश करा : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ

अनुसुचित क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी ८० पदे ही सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

रुपेश पाटील

Palghar News : पालघर जिल्ह्यात शिक्षक भरती पेसा अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. पेसामुळे जिल्ह्यात नोकर भरतीत आदिवासींना शंभर टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे 52 टक्क्यांपेक्षाही अधिक असलेल्या बिगर आदिवासी समाजातील सुशिक्षित, पात्र आणि गुणवत्ताधारक तरुणांवरही अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आमच्या जिल्ह्यात आम्हांला रोजगार का नाही ? असा सवाल करुन बिगर आदिवासी समाजातील पात्र आणि गुणवत्ताधारक उमेदवारांनी आजपासून (गुरुवार) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. (Maharashtra News)

सध्या पालघर सहित एकूण १३ आदिवासी जिल्ह्यांत विविध पदांसाठी पेसा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या भरतीमध्ये राज्याचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांचा ९ जून २०१४ चा अध्यादेश तसेच या अध्यादेशाच्या अनुषंगाने पेसा भरतीबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेले विविध शासन निर्णय या संदर्भाने आदिवासी समाजाला क व ड वर्गातील १७ संवर्गातील पदांसाठी १०० टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे.

त्यामुळे या आरक्षणाने बाधित झालेल्या आदिवासी व्यतिरिक्त मोठ्या संख्येने मूळ रहिवासी असलेल्या ओबीसी, एस्सी, एनटी, ओपन तसेच सर्वच बिगर आदिवासी प्रवर्गात असंतोष आहे. त्यासाठी २०१४ पासून बिगर आदिवासी समाज घटकांची आदिवासी जिल्ह्यांमध्ये आंदोलने सुरु आहेत.

याबाबत गेल्या ८ वर्षांत शासनाकडून कोणताही तोडगा निघत नसल्याने विविध बिगर आदिवासी संस्था व संघटना या भरतीबाबत विविध याचिका दाखल करुन न्यायालयात दाद मागत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासन निर्णयाला बगल

त्यामुळे आतापर्यंत निघालेल्या सर्वच पेसा भरतीच्या जाहिरातींवर उच्च व सर्वोच्च न्यायालयांकडून स्थगिती येऊन पेसा भरतीबाबतचा पेच व आदिवासी-बिगर आदिवासींच्या आंदोलनांमुळे आदिवासी जिल्ह्यांतील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असतांनाच महाराष्ट्र शासनाने ७ फेब्रुवारी २०१९ ला राज्यातील शिक्षक निवडीची प्रक्रीया पारदर्शक व्हावी यासाठी शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्याच्या शासन निर्णयाला बगल देत व १ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या राज्यपालांच्या २९/८/२०१९ रोजीच्या दुसऱ्या अधिसुचनेचा संदर्भ देत अनुसुचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदे ही सरळसेवेने भरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शासनाच्या निर्णयांचा संदर्भ देत शिक्षण आयुक्त, पुणे यांनी १७/८/२०२३ रोजी एका पत्रान्वये राज्यातील अनुसुचित क्षेत्रातील जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या एका पत्राद्वारे शासनाच्या ३/४/२०२३ च्या पत्राचा संदर्भ देत अनुसुचित क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी ८० पदे ही सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

शासनाने अनुसुचित क्षेत्रांतील भरतीबाबत वेळोवेळी घेतलेले निर्णय व सद्यस्थितीत शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने सुरु असलेली शिक्षक भरती ही फक्त आदिवासी समाजातील उमेदवारांसाठीच असल्याने बिगर आदिवासी समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांमध्ये असंतोषाचे (aandolan) वातावरण आहे.

शासनाच्या नव्या निर्णयानूसार पालघर जिल्हा परिषदेने पेसा शिक्षक भरती सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पालघर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त असलेल्या २१९४ रिक्त पदांपैकी १३१८ पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी पेसा क्षेत्रातील टीएआयटी परिक्षा दिलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली असून पालघर जिल्ह्यातून ७७८ आदिवासी उमेदवार पात्र झाले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे पात्र-आपात्रतेचे आकडे बदलत असले तरी रिक्त असलेल्या व भरावयाच्या जागांएवढे उमेदवार आदिवासी समाजातून पात्र न झाल्याने झाल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त रहाणार आहेत.

परंतु यापैकी या जिल्ह्यातील आदिवासी समाजाव्यतिरिक्त स्थानिक बिगर आदिवासी समाजातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्याबाबत शासन स्तरावरुन कोणतेही आदेश नसल्याने स्थानिक बिगर आदिवासी समाज या भरतीबाबत संभ्रमित व प्रतिक्षेत असतांनाच शासनाने क व ड वर्गातील इतर पदांची नोकरभरतीतही कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता सर्व पदे ही सरळ सेवेनेच करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शासनाच्या या धोरणाने पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज सोडून बहुसंख्येने असलेल्या इतर समाजातील नोकरीस पात्र स्थानिक उमेदवारांवर मोठा अन्याय होत असल्याने व पेसा भरतीबाबतचा निर्णय न्यायालयातील विविध जनहित याचिकांद्वारे प्रलंबित असल्याने जिल्हा परिषदेमार्फत सद्यस्थितीत सुरु असलेली पेसा अंतर्गत होणारी शिक्षक व इतर सर्वच पदांची भरती ही बिगर आदिवासी उमेदवारांच्या बाबतीत निर्णय होईपर्यंत त्वरीत थांबवावी.

आदिवासी समाजातील पात्र उमेदवारांची भरती होत असतांनाच स्थानिक बिगर आदिवासी उमेदवारांनाही भरती प्रक्रियेत समाविष्ट करुन घ्यावे व उर्वरित रिक्त जागांवर स्थानिक बिगर आदिवासी उमेदवारांची निवड करावी, अशी मागणी पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजातील टेट व टीईटी पात्र उमेदवारांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पालघर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

या मागण्यांसाठी बेमुदत उपाेषण

१) सरळसेवा पद्धतीने सुरू असलेल्या ऑफलाईन पेसा शिक्षक भरतीमधील शिल्लक राहिलेल्या रिक्त पदांवर बिगर आदिवासी पात्र स्थानिक उमेदवारांची भरती करावी

२) पेसा क्षेत्रातील क व ड संवर्गातील सर्वच पदभरतीमध्ये बिगर आदिवासी समाजातील पात्र स्थानिक उमेदवारांची भरती करावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT