परमबीर सिंग Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : परमवीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी!

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात अनेक महिने भूमिगत असलेल्या ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात गुरुवारी ठाणे न्यायालयाने अटक वारंट जारी केले आहे.

विकास काटे, साम टीव्ही

मुंबई : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात अनेक महिने भूमिगत असलेल्या ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात गुरुवारी ठाणे न्यायालयाने अटक वारंट जारी केले आहे. दरम्यान, आता परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झालेली असून ते "भगोडा" घोषित होण्याच्या वाटेवर आहेत. ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात भादंवि विविध कलमांसह आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा :

या गुन्ह्यात तब्बल २९ जणांचा समावेश असून चकमकफेम प्रदीप शर्मा, पोलीस उपायुक्त पराग मणेरा, दीपक देवराज, एन. टी. कदम, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ राजकुमार कोथीमिरे, स.पो.उप.नि. मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी , किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनु वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया , प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांचा समावेश आहे.

तर, दुसरीकडे कोपरी पोलीस ठाण्यातही परमवीर सिग यांच्या विरोधात दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० बी नुसार दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी केतन तन्ना आणि रियाज भाटी यांनी पोलीस ठाण्यात जबाबही नोंदविले होते. या दोन्ही गुन्ह्यात परमवीर सिंग हे फरारी आहेत. भूमिगत झालेल्या परमवीर यांचा शोध सुरु असतानाच गुरुवारी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. तांबे यांनी ठाणे नगर पोलिसांना माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अटक वारंट जारी केला. याबाबतची सूचना ठाणे नगर पोलिसांना देण्यात आली.

कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात दोन खंडणीची गुन्हे दाखल झाल्यानंतर ठाणे न्यायालयात याबाबत सुनावणीत न्यायालयाने परमवीर सिंग यांच्याबाबत विचारणा केल्यानंतर न्यायालयात ठाणेनगर पोलीस आणि सीबीआय यांनी त्यांच्या मूळगावी तपस केला. मात्र ते आढळून न आल्याचा आवाहल न्यायालयात सादर केल्यानंतर ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात परमवीर सिंग यांच्या विरोधात अटक वारंट जरी करून त्यांना अटक करून न्यायालयात हजार करा असे आदेश मुख्य न्यायाधीश आर. जे. तांबे यांनी दिले.

ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात परमवीर सिंग यांच्यासोबत तब्बल २९ जणांचा समावेश आहे. यात आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. ठाणे न्यायालयात परमवीर सिंग या खंडणी प्रकरणात फरार असल्याने अखेर पोलिसांनी शोध घेतल्यानंतरही परमवीर सिंग हे न सापडल्याने अखेर न्यायमूर्ती आर. जे. तांबे यांनी अटक वारंट जारी केले. येणाऱ्या काही दिवसातच कोपरी मधील खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी ही परमवीर सिंग याच्या विरोधात अटक वारंट जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही परमवीर सिंग हे न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांना "भगोडा" घोषित करण्याची शक्यता वाढलेली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT