Pratap Sarnaik  
मुंबई/पुणे

Pratap Sarnaik : 'मला कुणीही अडवलं नाही, अडवणाऱ्याला मी भीक घालत नाही'; प्रताप सरनाईकांचा मोर्चेकऱ्यांना सुनावलं

Pratap Sarnaik : 'मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणाऱ्याला मी भीक घालत नाही', अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिली. 'अशांना तोंड द्यायला प्रताप सरनाईक हा सक्षम आहे', असंही ते यावेळी म्हणाले.

Prashant Patil

मुंबई : मीरारोडवर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोर्चेकरांनी राज्याचे मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांना विरोध केला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चेकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रताप सरनाईक या मोर्चातून काढत पाय घेतला. त्यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, 'मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणाऱ्याला मी भीक घालत नाही', अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिली. 'अशांना तोंड द्यायला प्रताप सरनाईक हा सक्षम आहे', असंही ते यावेळी म्हणाले.

मीरारोडवर मराठीच्या मुद्द्याला विरोध करत परप्रांतिय व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी एक मोर्चा काढला होता. त्यामध्ये त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या मारहाणीला विरोध केला होता. त्याचवेळी मराठी माणसाच्या विरोधात त्यातील काही व्यापाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे या व्यापाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मराठी लोकानी मिरा भाईंदरमध्ये एक विराट मोर्चा काढला.

मीरारोडवर अखेर मनसे आणि शिवसेनेचा मोर्चा निघाला. दोन तासांच्या राड्यानंतर अखेर हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे ज्या मार्गावरून मोर्चा काढण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्याच मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईकांना मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. प्रताप सरनाईकांना मोर्चेकऱ्यांनी अक्षरशः मोर्चातून हुसकावून लावलं. त्यांच्यासमोर 'पन्नास खोके, एकदम ओके'च्या अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे प्रताप सरनाईकांना या मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला.

मोर्चेकरांच्या भूमिकेवर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, 'मला कुणीही अडवलं नाही. मला अडवणाऱ्यांना मी भीक घालत नाही. त्यांना तोंड द्यायला प्रताप सरनाईक सक्षम आहे. गेली २० वर्ष या विभागाचं मी प्रतिनिधीत्व करतोय. त्यामुळे मला काही फरक पडत नाही', असं ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी आंदोलन पुन्हा आक्रमक - नाशिक

Independence Day Wishes Marathi: स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना पाठवा खास प्रेरणादायी शुभेच्छा

Independence Day Speech: तुमच्या मुलांना मराठीत लिहून द्या स्वातंत्र्यदिनाचं भाषण; ऐकून सगळेच करतील कौतुक

BMC निवडणुकीसाठी जोरदार तयारी, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; फडणवीस म्हणाले..

उड्डाणपुलाच्या कामाचा विलंब, रस्त्यावर खड्डे; टेम्पो अडकून अपघात|VIDEO

SCROLL FOR NEXT